if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

साजण येती घरा

 साजण ऐती घरा.


फुलला पलाश या चैताच्या मासी,

सांगतो आकर्षून आला वसंत घरी.

गुढ्या तोरणाच्या सणात, दारी सुंदर रांगोळी,


शृंगार करुनिया नार उभी या दारी.

भरल्या गोकुळात सौख्य नांदावे घरी.


देखण्या अबोलीचा गजरा माळून शिरी,

वेणी बांधते हसून आरशात पाहुनी.


ती नाजूक चरणे घुटमळत दारी होती.

वाट पाहते कोणाची, येईल सांगा कोणी?


गूज कोगुळ गातो, बोलून सांगे निरोप.

येईल साजण तुझा, आज तुझला भेटायला.


दारी येता घरधनी, दूर देशाहून परत.

पाहता होते तृप्त, आज आसुसलेले मन.


तुम्हा पाहता लोचने झाली तृप्त,

काळजाच्या स्पंदनानी केले हसून स्मित.


नको सोने नाणे मज, नको सुंदर पैठणी.

तुम्हा पाहता सखया, वाटे स्वर्ग आला घरी.


आज पाडव्याच्या दिवशी, करते पुरणपोळी,

कडू गोड आठवणींचे,  सौख्य नांदावे या घरी.

निशिकांत हारुगले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाहूया रम्य देखावा

  पाहूया रम्य देखावा निळ्या, निळ्या खाडी मध्ये, डुंबती या मासोळ्या. खुणवूणी काठावरी, बोलती अबोल कळ्या. दूर तिथे क्षितिजावर, बुडे सोन्याचा ग...