नार घाटाची
थोडीशी लाजते, गालात हसते.
शृंगारूनी तनु काया
वळवळूनी मागे पाहसी,
अशी कशी ग तुझी कळा.
कळी उमलुनी फुल होते,
तिचे आयुष्य का शृंगाराचे.
जीवन दिले हे तुजं देवाने,
घडवी नव जीवन सोनियाचे.
सिंहसम कटी ही तुझी, हलवत जाशी,
रंभे सारी का मिरविशी.
कामातुरांच्या कित्येक नजरेची,
शिकारन्या हरणी सारखी वावरशी.
जन्म तुझा ग फुका फुकीचा,
कशाला करशी वेडा चाळा.
जन्म मरण लाभते एकदा,
करावे घटित असे काही.
अमर करावे नाव इतिहासी,
अजरामर होऊन जाई.
करुन गेल्या विक्रम भारी,
गाणे तयाचे गाती सह्यशिळा.
त्या मातीतच जन्म तुझा गंध,
मदांध होऊन मंचकी लोळण का घेशी.
सोड पाश त्या मोह मायेचा,
चिखलात त्या का मळशी.
घडव धरेचे दिव्य ललाट,
विज्ञानाची कास धर जरा.
नव नव्या कल्पना करुनी, उगवू दे नव पहाट.
घडव भविष्य तुझ्या जीवनाचे,
गाठूनी शिखरे विक्रमाची.
………… ……. ……….