आला वसंत
आकाशाची निळीनिळाई बहरली डोळ्यात,
शितल छाया देती प्रेमाची मोहरले रान वृक्ष.
चैताच्या पावन मासात सजला सुंदर साज.
यावे यावे सुमधुर गावे आता प्रणयगीत.
आला वसंत आला वसंत, प्रणय घेऊन
नव जीवनात जातो आनंद देऊन.
सुटता वारे फुटती अंकुर उभ्या या झाडांना
साज शृंगार पानाफुलांचा फुलतो केवडा.
मोहरल्या झाडांचा मार्दव गंध पसरला,
चला लुटुया खजाना या सुंदर धरित्रीचा.
यावे यावे सुमधुर गावे….
उंच उंच जातो हिंदोळा शिवाया आभाळा,
हसत-खिदळत झोके घेऊ आनंद वन भुवनाचे.
सुमधुर गाती किलबिल पाखरे कंठ रुजला गळ्यात.
मधूर गाणे सुमधुर एकावे चिव्याच्या पावरीत.
सांगे यावे यावे सुमधुर गावे…. …..
बहरल्या फुलवेली सुंदर साजऱ्या,
थाट तयाचा उठूनी दिसे नवपानी रानावनात.
भ्रमर फिरती गुंजारवत मंडळ करुनी,
मकरंदाची अवीट गोडी चाखूनी पहात.
यावे यावे सुमधुर गावे…. …..
तुझ पाहता लपूनी सखया,
धड धडते माझे अंतर.
नजर भेटता नजरेस फुटतो अबोल कंठ,
अधरातून निघती माझ्या ते प्रणय गीत.
यावे यावे सुमधुर गावे…. ….
कवी- निशिकांत हारुगले
नव गीत
आला वसंत आला वसंत
आकाशाची निळीनिळाई बहरली डोळ्यात,
शीतल छाया देती प्रेमाची, मोहरले रान-वृक्ष.
चैत्राच्या पावन मासात सजला सुंदर साज,
यावे यावे सुमधुर गावे आता प्रणयगीत.
आला वसंत आला वसंत, प्रणय घेऊन,
नवजीवनात जातो आनंद देऊन.
आला वसंत आला वसंत, रंग घेऊन,
फुलल्या मनात प्रेमाचे गीत गाऊन.
सुटता वारे फुटती अंकुर उभ्या या झाडांना,
साज शृंगार पानाफुलांचा फुलतो केवडा.
मोहरल्या झाडांचा मार्दव गंध पसरला,
चला लुटुया खजाना या सुंदर धरित्रीचा.
यावे यावे सुमधुर गावे,
आता प्रणयगीत गावे.
फुलल्या या ऋतुरंगात,
मनाने मनाशी जुळावे.
उंच उंच जातो हिंदोळा शिवाया आभाळाला,
हसत-खिदळत झोके घेऊ आनंद वनभुवनाचा.
सुमधुर गाती किलबिल पाखरे, कंठ रुजला गळ्यात,
मधुर गाणे सुमधुर ऐकावे चिमणीच्या पावरीत.
यावे यावे सुमधुर गावे,
वाऱ्यासंगे डोलत जावे.
फुलांच्या या सुगंधात,
प्रेमाचे रंग उधळावे.
बहरल्या फुलवेली सुंदर साजऱ्या,
थाट तयाचा उठुनी दिसे नवपानी रानावनात.
भ्रमर फिरती गुंजारवत मंडळ करुनी,
मकरंदाची अवीट गोडी चाखुनी पहात.
यावे यावे सुमधुर गावे,
मधुर मिलनाचे सूर छेडावे.
फुलांच्या या दरवळात,
प्रेमाचे गुपित सांगावे.
तुला पाहता लपुनी सखया,
धडधडते माझे अंतर.
नजर भेटता नजरेस फुटतो अबोल कंठ,
अधरातून निघती माझ्या ते प्रणयगीत.
यावे यावे सुमधुर गावे,
तुझ्या माझ्या मनातले गावे.
नजरेतून उमटलेल्या,
प्रेमाच्या भावना सांगावे.
कोवळ्या उन्हात तुझी सावली माझ्या सोबतीला,
फुलांच्या वाटेवरती चालू या हातात हात घेऊनी.
वाऱ्याच्या मंद झुळुकीत तुझा स्पर्श जाणवतो,
मनाच्या या वीणेवरती प्रेमराग उमटतो.
आला वसंत आला वसंत, प्रणय घेऊन,
नवजीवनात जातो आनंद देऊन.
आला वसंत आला वसंत, रंग घेऊन,
फुलल्या मनात प्रेमाचे गीत गाऊन.
सांज उतरता नभामध्ये रंग सोनरी पसरला,
चंद्रकोरीच्या प्रकाशात प्रेमदीप हा उजळला.
तू जवळ असता सखया जग सुंदर भासते,
तुझ्या एका हास्यामध्ये माझी दुनिया सामावते.
यावे यावे सुमधुर गावे,
मनामनांचे सूर जुळावे.
आला वसंत प्रेम घेऊन,
आपुले जीवन फुलवावे.
आला वसंत आला वसंत, प्रणय घेऊन,
नवजीवनात जातो आनंद देऊन.
आला वसंत आला वसंत, रंग घेऊन,
फुलल्या मनात प्रेमाचे गीत गाऊन.
- निशिकांत हारुगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा