if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

सागवेळू

 सागवेळूच्या बनात, करारती वेत.

गोडगुंजन भ्रमरांचे तळ्यातील कमळात.

वेड्या वाकड्या ओढ्याचे पाणी खळाळत गाजे.

तहानलेल्या झाडोय्रांना सुखावत चाले.

कापूस पिंजला अंबरी काळया पांढऱ्या मेघांचा,

खेळ चालला चालला श्रावणी उन पावसाचा .

हिरव्या गर्द झाडीतून गूज कोकीळ बोलतो,

मधूर कुहुकुहू गीत कानात पडते,

थुई थुई पावलांवर मुयुर नाचतो रानात,

रंगीबेरंगी पिसारा त्याच्या फुलतो अंगात,

गोल रिंगनाच्या तळ्याच् नीळ नीळ पाणी,

मासोळ्यांचा खेळ रंगला लपाछपीचा जळी.

फुले नाजूक नाजूक सुंदर साजिरी फुलली, 

तयांचा मकरंद मधमाशी हळूच पळवती .

झूळूक वाऱ्याची गाते घुम घूम गीत , 

कसे वाद्यांविन वाजे निसर्गाचे संगीत. 

अशा सुंदर श्रावणात फिर फिरावेसे वाटते ,

सह्याद्रीच्या कुशीत निज निजावेसे वाटतें.


निशिकांत हारुगले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रेमाची चाहूल

 प्रेमाची चाहूल - कवी - निशिकांत हारुगले चांदण्यांच्या सरींमध्ये, तुझीच चाहूल लागली,  मंद वाऱ्याच्या कुशीत, प्रीत माझी जागली।   नयनी तुझ्या ...